Monday 28 December 2015

माहे डिसेंबर अखेर वसुली.

आजच आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार माहे डिसेंबर 2015 मध्ये आपल्या सर्वांच्या जि.प.शिक्षक पतसंस्थेची वसुली 550000 रुपयांच्या पुढे गेली आहे. आम्हीआपल्या सर्व सभासद बांधवांचे आभार व्यक्त करतो. अशीच सहकार्याची आपणा सर्व सभासद बांधवांकडून अपेक्षा आहे. आपली मासिक वसुली अपेक्षित अंदाजे 900000 रुपये आहे. काही दिवसातच आपण ती गाठूत अशी खात्री आम्ही आपणास देत आहोत.
धन्यवाद..
जि.प.शिक्षक पतसंस्था गंगाखेड..एक पाऊल प्रगतीकडे.
.
.
अधिक घडामोडींसाठी facebook वर लाईक करा
जि.प.शिक्षक पतसंस्था गंगाखेड

सुरुवात...

सर्व शिक्षक बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार,
---मित्रांनो आपल्या जि,प,शिक्षक पतसंस्थेच्या काही बाबी ज्या आम्ही सर्व ११ विश्वस्तांनी मिळून कार्यान्वित करण्याचा प्रयत्न चालवला आहे त्या सर्व बाबी आम्हाला आपल्याशी शेअर करावयाच्या आहेत. ज्यांच्यामुळे आज आम्ही पतसंस्थेत आहोत त्यांच्या साठी वचनपूर्तत्वाकडे जात असताना आम्हा सर्वाना निश्चितच आनंद होतो आहे. या नवीन पर्वाच्या कालावधीत संस्थेच्या सर्व सन्माननीय सभासदांसाठी संस्थेने जी काही नवीन पाऊले उचलली आहेत त्या सर्व बाबींची आपणास माहिती देणे क्रमप्राप्त ठरते.
---मित्रांनो आजमितीस नव्या पंचवीस एक शिक्षकांना सभासदत्व बहाल करण्यात आले आहे.
--- ज्या तातडी कर्जासाठी अगोदर किमान १० -१२ दिवस लागायचे कधीकधी २-२ महिने सभासदांना तातडी कर्ज देण्यासाठी निधी उपलब्ध व्हायचा नाही. त्या दिशेने एक धाडशी पाउल उचलून आम्ही तातडी कर्ज एक दिवस ते दोन दिवसात उपलब्ध करून देत आहोत. त्यापुढेही मी असा विश्वास देऊ इच्छितो कि काही दिवसात तातडी कर्ज केवळ एका तासात उपलब्ध करून देऊत.
--- तातडी कर्ज मागेल त्याला, मागेल तेव्हा उपलब्ध आहे,
---कोणत्याही कर्जाच्या फॉर्मवर लावण्यासाठी पोस्टाचे रिसीट तिकीट आता आपल्याला आपल्या फॉर्मवर संस्थेकडूनच उपलब्ध होत आहे.
----संस्थेत आता कोणत्याही फॉर्मसाठी सन्माननीय सभासदांना फॉर्मफीस देण्याची गरज नाही. सर्व फॉर्म मोफत वितरीत होत आहेत.
---मागील काळातील प्रताप पाहता संस्थेकडे सद्यस्थितीत दीर्घ मुदतीच्या कर्जाचे वाटप करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध नाही परंतु येत्या २ महिन्यात तो निश्चितपणे उपलब्ध करून देण्यात येईल.
---आपल्या काही बांधवानी मागच्या कार्यकाळात दीर्घ कर्जासाठी संस्थेकडे शेअर्स चा भरणा केला होता परंतु तातडी कर्ज देणे शक्य नसणा-यांना दीर्घ कर्ज देणे झाले नाही, परंतु त्या सभासदांची शेअर्स ची रक्कम संस्थेकडे अडकून होती ती रक्कम संस्थेने बँकेच्या मुख्यशाखेकडून परवानगीने सभासदांना परत करण्यासाठी उपलब्ध केली असून त्या सन्माननीय सभासदांना त्यांच्या सोयीनुसार कधीही उचलता येईल.यात श्री बिरादार सर, श्रीम. बोडके ताई तसेच दुर्दैवाने निधन झालेले कै.मुंढे सर यांचा समावेश आहे.
---संस्थेने सभासदांसाठी अभिनव योजना आखत मासिक ठेव व मुदत ठेव या योजना नव्या व्याजदारांसह सुरु केल्या आहेत. त्यानुषंगाने आजमितीस पंचवीसएक सभासदांनी संस्थेकडे मासिक ठेवी (आर.डी.)सुरु केलेल्या आहेत.
---एक लाखाच्या आतबाहेर असणारी मासिक वसुली आता पाच लाखाच्या घरात आहे.
---थकबाकीदारांकडून वसुलीसाठी कायदेशीर पाऊले उचलून जवळपास ७० थकबाकीदारांना प्रथम नोटीसा दिल्या आहेत, यानंतरही ज्यांनी भरणा केला नाही त्यांना व त्यांच्या जामीनदारांना द्वितीय वेळी वकिलांमार्फत नोटीसा जातील, त्यानंतर तृतीय नोटीसीनंतर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
---काही दिवसांनी थकबाकीदारांची नावे Whatsapp, Facebook, Twitter यासारख्या सोशल मीडियातून जाहीर करण्यात येतील.
मित्रांनो या सर्व काही चांगल्या योजना राबवण्यात आपल्या सर्वांचा मोलाचा वाटा आहे, आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. यापुढेही आपले मनस्वी सहकार्य लाभेल अशी अशा व्यक्त करतो. आपल्याकडून या सर्व योजनांसाठी काही धोरणात्मक बाबी असतील त्या संस्थेस जरूर कळवाव्यात, संस्था त्यासाठी आग्रही व त्या बाबी कार्यान्वित करण्यासाठी अग्रेसर असेल अशी आपणास ग्वाही देऊन थांबतो.
--
--
शुभरात्री.
facebook वर जि.प.शिक्षक पतसंस्था गंगाखेड ( www.facebook.com/जिपशिक्षक-पतसंस्था-गंगाखेड-15013638635276…/ ) या पेज ला लाईक करा आणि राहा अपडेट.
.
.
--जि.प.शिक्षक पतसंस्था गंगाखेड एक पाऊल प्रगतीकडे....