Saturday 16 April 2016

“ जि.प.शिक्षक पतसंस्था गंगाखेड - मुदती ठेवींना प्रारंभ”

जि.प.शिक्षक पतसंस्था गंगाखेड - मुदती ठेवींना प्रारंभ”
---सर्व शिक्षक बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार,
----तुम्हा सर्वांचा एक विश्वस्त आणि लोकसेवक म्हणून आपणा सर्वाना कळवण्यात मला मनस्वी आनंद होत आहे कि आपल्या सर्वांच्या हक्काच्या पतसंस्थेत आज दिनांक 16/04/2016 रोजी पासून मुदती ठेवी तथा FD ठेवण्यास सुरुवात झाली आहे. याचा सर्वप्रथम मान जातो तो जि.प.प्रा.शा. खोकलेवाडी शाळेतील आमच्या भगिनी सौ.सुनिता अण्णासाहेब शिंदे तथा त्यांचे पती श्री.शेळके सर या दाम्पत्यास. आज त्यांनी आपल्या संस्थेत येऊन रोख रक्कम भरून FD केली. मी आपल्या सर्व सभासद बांधवांच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.
----मित्रानो तुम्ही सर्वांनी आमच्यावर जो विश्वास दाखवून आम्हाला संस्थेत सेवा करण्याची संधी दिली त्याचाच हा परिणाम आहे. आपल्या संस्थेच्या इतिहासात प्रथमच ठेवी ठेवण्यासाठी उपरोक्त दाम्पत्याने पुढाकार घेतला आमच्यावर विश्वास ठेवत हे क्रांतिकारी पाऊल टाकले हि गोष्ट साधी नाही. आपल्याकडे पतसंस्था ह्या केवळ कर्ज घेण्यासाठीच असतात हा आपला समज परंतु या संस्था आपल्या विकासाचे एक साधन म्हणून इथे गुंतवणूक करणे हा विकासात्मक दृष्टीकोन आहे. आपली संस्था हि आता पुढारलेल्या आणि सर्वसमावेशक विकासाने भारावून परिपक्व असलेल्या संस्थेकडे वाटचाल करत आहे हि आपल्या सर्वांसाठी एक आश्वासक आशादायी बाब आहे.
-----मित्रांनो माझं अस निरीक्षण आहे कि, आपल्या संस्थेच्या मागच्या नेतृत्वाने संस्थेची पत लयाला नेली होती. त्यामुळे कुणाचीही संस्थेत गुंतवणूक करण्याची इच्छा वा मानसिकता होत नव्हती. त्याचा संस्थेवर खूप परिणाम झाला होता. कदाचित या असल्या गचाळ, नीतीहीन व भ्रष्टाचारी नेत्याच्या नेतृत्वात संस्था लयाला गेली असती. आता मात्र आपल्या संस्थेत असल्या दुष्ट व भ्रष्ट मानसिकतेला तिळमात्रही थारा नाही आणि भविष्यातही असली नीतीहीन माणसे आपल्या संस्थेत येणार नाहीत अशी तरतूद आपण करून ठेवू या.
----मित्रानो या सोशल मिडीयाच्या माध्यमातून मी अपना सर्वाना विनंती वजा आवाहन करतो कि आपण आपल्या गंगाखेड पतसंस्थेकडून गरजेनुसार हक्काचे कर्ज घ्या अथवा आपल्याकडील भांडवल  संस्थेत गुंतवून आकर्षक व्याजदराचा लाभ घ्या. आपली संस्था हि तुमच्या सर्व कार्यात तुमच्यासोबत 100 टक्के आहे. विश्वास ठेवा मित्रांनो आपली संस्था हि तुमच्या विकासात्मक कार्यात एक हक्काचे  साधन आहे, आणि इथे तुमच्या हक्काचे संचालक मंडळ तूमच्या सेवेत कायम उपस्थित आहे.
-----पुनश्च एकदा मी श्री शेळके सर व सौ शिंदे ताई तसेच आपले सर्व सन्माननीय संचालक मंडळ आणि अर्थात आपल्या सर्व सन्माननीय सभासद बांधवांचेहि आभार व्यक्त करतो. आणि आपणा सर्वांना एका सुंदर दिवसाच्या नवीन उर्जा प्रदान करणाऱ्या शुभेच्छा देतो, आणि थांबतो. धन्यवाद.
शुभ सकाळ.
जि.प.शिक्षक पतसंस्था गंगाखेड एक पाऊल प्रगतीकडे.
You can visit us @

www.facebook.com/जिपशिक्षक-पतसंस्था-गंगाखेड-1501363863527649/

Sunday 10 April 2016

*******दीर्घ मुदती कर्जाची उद्घोषणा******

*******दीर्घ मुदती कर्जाची उद्घोषणा******
सर्व शिक्षक बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार,
--मित्रानो मला आज आपल्यासमोर आपल्या गंगाखेड पतसंस्थेच्या नवीन निर्णयाचे प्रकटीकरण करताना मनस्वी आनंद होतो आहे कि, आपल्या पतसंस्थेमार्फत आता आपण दीर्घ मुदतीच्या कर्जाचे वाटप सुरु करत आहोत. इतके दिवस म्हणजे जवळपास गेल्या एक वर्षापासून दीर्घ मुदतीच्या कर्जाचे वाटप बंद होते. या मागे खूप करणे होती. एक तर मागील संचालक मंडळाच्या अनागोंदी कारभारामुळे संस्थेची पतप्रतिष्ठा खालावली होती.त्यातच मागच्या मंडळाच्या नेतृत्वाने कर्जवाटप करताना दुटप्पी भूमिका घेतलेली दिसून येते. त्यात भरीस भर म्हणजे निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन वसुलीला पूर्ण फाटा दिला होता. वसुली करण्यात धड संचालक मंडळाला रस नव्हता ना कर्मचाऱ्यांना, त्यामुळे झाले काय कि संस्थेकडे येणाऱ्या पैशाचा ओघ कमी झाला त्यातून पुन्हा बँकेचे दरमहाचे व्याज आणि भरीस भर म्हणून चार चार कर्मचाऱ्याची भरती करून ठेवलेली. त्यामुळे दरमहाचे संस्थेचे मेंटनन्स सुद्धा करणे शक्य नव्हते.
--या पार्श्वभूमीवर आपण आमच्यावर विश्वास ठेऊन संस्थेत आमची वर्णी लावली आणि त्याच बरोबर आमच्या नियोजन आणि धोरणात्मक बाबींना सकारत्मक साथ दिली त्यातून वसुलीला खूप सहाय्य होत आहे आणि त्यामुळेच आपणास आता दीर्घ मुदती कर्जांचे वाटप करणे शक्य होत आहे. सद्य स्थितीत आपण सर्व प्रकरणांना एकदम न्याय देऊ शकणार नाहीत कारण आपल्याकडे आजमितीस जेवढा निधी शिल्लक आहे त्यानुसारच वाटप करता येईल. आता कुठे आपली संस्था रुळावर येत आहे. त्यामुळे आपण आलेल्या सर्व प्रकरणांना नैसर्गिक न्यायाच्या भूमिकेतून प्रथम आलेल्या अर्जांना प्राधान्यक्रम देऊन कर्जाचे वाटप करणार आहोत.
---मित्रांनो मागच्या भ्रष्टाचार बहाद्दूर मंडळाच्या कारभारामुळे आपल्या संस्थेचे अतोनात नुकसान झाले आहे ते भरून काढताना खूप त्रास होतो आहे. ह्यांचे कारनामे एवढे आत्मघाती आहेत कि सांगता सोय नाही. या वेळेस जर आपण संचालक निवडणुकीत चूक केली असती तर कदाचित आपली संस्था आज आवसायनात निघाली असती. त्यांनी केलेल्या एक एक चुका भरून काढण्यात आज संस्थेचा खूप वेळ जात आहे. आपले पालकत्व असलेल्या मध्यवर्ती बँकेत सुद्धा ह्यांच्या भ्रष्ट आणि अनागोंदी कारभारामुळे संस्थेची पत राहिली नसल्यामुळे गरज असताना सुद्धा संस्थेस बँकेची सी.सी.वाढून मिळत नव्हती. मागच्या काही दिवसांच्या आपल्या चांगल्या कार्याची दखल घेत आता बँकेने सुद्धा आपणास सी.सी.वाढवून देण्याची तयारी दर्शवली आहे.
----मित्रांनो आज संस्था जी काही विकासात्मक वाटचाल करत आहे त्याचे सर्व श्रेय हे आपल्या सर्व सभासद बांधवाकडे जाते. तुमच्या सर्वांच्या पाठींब्याशिवाय काहीही शक्य नाही. अशीच आमच्या पाठीवर आपल्या सहकार्याची थाप ठेवा. तुम्हा सर्वांच्या सहकार्याने येत्या काही दिवसात आपली संस्था महाराष्ट्रातील एक आदर्श संस्था म्हणून आपण नावारूपास आणूत या आशावादासह आपणासर्वाना एका चांगल्या नवनवेन्मेषालिनी दिवसाच्या शुभेचा देऊन थांबतो.
धन्यवाद
सुप्रभात.