Monday 29 February 2016

जि.प.शिक्षक पतसंस्था गंगाखेड बनली वाय-फाय सोसायटी.

जि.प.शिक्षक पतसंस्था गंगाखेड बनली वाय-फाय सोसायटी.
सर्व शिक्षक बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार,
-----मित्रांनो आपणास कळवण्यात आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे कि आम्ही आपणास पतसंस्थेच्या निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या जाहीरनाम्यातील एक एक गोष्ट तंतोतंतपणे अमलात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. पतसंस्थेचा प्रत्येक सभासद हा संस्थेचा मालक पालक आहे या भूमिकेतून आम्ही सर्व 11 विश्वस्त लोक आपल्या सर्व शिक्षक बांधवांसाठी सर्वतोपरी उत्तम कार्य करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यादृष्टीने केलेले बदल अंमलात येत असलेले आपणास दिसून येत असेलच. त्याचाच एक भाग म्हणून व आधुनिक काळाची गरज म्हणून आपण आज दिनांक 29/02/2016 पासून आपली पतसंस्था वाय-फाय(wi-fi) करत आहोत.  अशाप्रकारच्या सेवा देणा-या संस्था आपल्याकडे विरळ आहेत.
----मित्रानो आपण सर्व आज आधुनिक युगात वावरत आहोत. आज आपल्यातील जवळजवळ प्रत्येकाकडे android मोबाईल आहेत. आपण आज आपल्या शाळा e-learning करण्यावर जोर देत आहोत. त्याकार्याला अनुसरून आमचा प्रयत्न आहे कि, पतसंस्थेला पारदर्शक वातावरणात घेऊन जात असताना आपल्याला संगणक व इंटरनेट ची आवश्यकता भासणार आहे. त्याच बरोबर जर आमची संस्था वायफाय बनली तर आमचे बांधव संस्थेत येऊन मोफत इंटरनेट सेवेचा लाभ घेतील, कुणी शाळेसाठी आधुनिक साहित्य तयार करेल तर कुणी शाळेची online ची कामे करतील. या दरम्यान आमचे बांधव संस्थेचा कारभार कसा चालू आहे याकडेही लक्ष देतील जेणे करून आपली संस्था पारदर्शक मार्गावर नेण्याचे आपले अंतिम उद्दिष्ट साध्य होईल. त्याच बरोबर आमच्या बांधवांना संस्थेतील कामकाज कसे चालते याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळेल आणि भविष्यातील सहकारातील भावी तज्ञ संचालक मंडळाची जडणघडण सुद्धा होईल. यातून आपल्या बांधावाची तंत्रस्नेही क्षमता वाढावी त्याचा फायदा आमच्या विद्यार्थ्यांना व्हावा तद्वतच आपल्याकडील प्रशासकीय कार्यात गतिमानता यावी हाही यामागचा उद्देश.
----असो जि.प.शिक्षक पतसंस्था गंगाखेड अपणा सर्वाना आवाहन करत आहे कि आपण आपल्या हक्काच्या संस्थेत आपला मोबाईल,laptop,tab घेऊन जाऊन आपणास पाहिजे त्या कार्यासाठी मोफत इंटरनेट सेवेचा लाभ घ्यावा.
धन्यवाद ...आपला दिवस शुभ जावो...

जि.प.शिक्षक पतसंस्था गंगाखेड ...एक पाऊल प्रगतीकडे.

Sunday 21 February 2016

सभासद फॉर्म भरण्यासाठी नाव नोंदणी फॉर्म..

----सर्व शिक्षक बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार,
---मित्रांनो आपल्या पतसंस्थेच्या कार्यक्षेत्रातील म्हणजे आपल्या गंगाखेड तालुक्यातील आपले काही शिक्षक बांधव आपल्या पतसंस्थेचे सभासद नाहीत. त्यामुळे आपल्या या बांधवांना आपल्या संस्थेचे सभासदत्व देणे क्रमप्राप्त ठरते. यासाठी आम्ही आज आपल्या समोर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एक लिंक देत आहोत. आपण या लिंकवर जाऊन सभासद फॉर्म भरावा.
--आपण केवळ फॉर्म भरून द्या पुढील प्रक्रिया आपल्या पतसंस्थेचे कर्मचारी पूर्ण करतील. ते आपल्याला अगोदर फोन करून आपल्याशी संपर्क करतील व नंतर बाकीची प्रक्रिया पूर्ण करून घेतील.
सभासद फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा.


----जि.प.शिक्षक पतसंस्था गंगाखेड, एक पाऊल पुढे.



.

Tuesday 16 February 2016

तंत्रस्नेही शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा गंगाखेड.


दिनांक 15/02/2016 रोजी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत आपल्या जि.प.शिक्षक पतसंस्थेच्या सहकार्याने शिक्षण विभाग गंगाखेड यांनी गंगाखेड तालुक्यातील तंत्रस्नेही शिक्षकांसाठी एक खास कार्यशाळेची पर्वणी दिली. या कार्यशाळेस श्री. Balaji Jadhav बालाजी जाधव उपशिक्षक शिंदेवस्ती ता.माण जि. सातारा यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यशाळेचा तालुक्यातील 140 शिक्षकांनी लाभ घेतला. प्रस्तुत कार्यशाळेत श्री. बालाजी जाधव यांनी सांगितलेल्या काही बाबी पुढील प्रमाणे आहेत.
--math foundation.
--Emma's spelling game.
--Stalleriam.
--Epic pen.
---Magic Whiteboard.
--Microsoft edge.
--Blue stack
--Enigeo.
--Text Fairy
--Windows Movie maker
--Microsoft mouse mischief
--Youtube channe
--ppt
--google form
---google earth
-- या आणि अशा कितीतरी उपयुक्त software बद्दल विस्तृत माहिती दिली.
---त्याच बरोबर शाळा कमी खर्चात digital कशा बनवायच्या आणि अल्पखर्चात आपल्या शाळांमधून E-Learning च्या माध्यमातून गुणवत्ता कशी फुलवायची याचे ओघवत्या शैलीत मार्गदर्शन केले.
----मित्रांनो आजमितीस आपल्या उभ्या महाराष्ट्रात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा कार्यक्रम चालू आहे या पाठीमागे आपल्या शिक्षक वर्गाने android mobile च्या माध्यमातून केलेल्या शैक्षणिक चळवळीचा मोठा वाटा आहे. एव्हढी चळवळ पेटली कि प्रशासनाने खडबडून उठून या चळवळीकडे सकारात्मकरित्या पहिले. यामागे मा. नंद्कुमारजी, मा. भापकर साहेब, मा. नांदेडे साहेब यांच्या दृष्ट्या, विश्लेषक, भविष्याचा वेध घेणाऱ्या नजरांनी हि चळवळ हेरली व अनुभवली आणि यातूनच ज्या संकल्पनेचा जन्म झाला ती संकल्पना म्हणजे "प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र" परंतु या android mobile च्या शैक्षणिक क्रांतीच्या मुळाशी जर आपण जाऊन पहिले तर या ध्येयवेड्या बालाजी जाधव यांच्या कार्यावर आपली नजर पडेल.
---या व्यक्तीने महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्राला वाहून घेतलेला पहिला blog जो crcmhaswad या नावाने तयार केला तो blog खऱ्या अर्थाने कुठेतरी या चळवळीचा पाया तयार करत होता असे म्हटले तर ती एक वस्तुस्थिती ठरेल. आजही हा व्यक्ती अख्ख्या महाराष्ट्रात तंत्रस्नेही शिक्षकांना पुढच्या टप्प्यावरचे ज्ञान देण्याचे कार्य अविरतपणे करतो आहे. नुकत्याच त्यांच्या एक जानेवारी च्या 16 apps ने महाराष्ट्रातील शैक्षणिक चळवळीला धार आणलेली आपण पहिली आहे. Google सारख्या बहुराष्ट्रीय कंपनीला त्यांच्या कार्याची दखल घ्यावी लागली "हि गोष्ट काही सामन्य जाहली नाही"
--असो त्यांच्या कार्यात अशीच वृद्धी होवो आणि तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य शिक्षकांना याचा लाभ होऊन तो विद्यार्थ्यांपर्यंत पोह्चो हि अपेक्षा.
---या कार्यक्रमासाठी आपल्या जि.प.शिक्षक पतसंस्था, गंगाखेड ने पुढाकार घेतला व शिक्षण विभागाने त्याला साथ दिली व आपल्या सर्व शिक्षक बांधवांना एका सुंदर कार्यक्रमाची मेजवानी मिळाली. आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया ऐकल्या, आनंद वाटला. भविष्यातसुद्धा आपली पतसंस्था अशाच काही चांगल्या कार्यक्रमांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देईल अशी मी आपणासग्वाही देतो.
---मित्रांनो हा कार्यक्रम तुम्हासर्वांच्या सहकार्याशिवाय यशस्वी होणे शक्य नव्हते तेव्हा या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ज्यांचे ज्यांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य लाभले त्या सर्वांचे आभार व्यक्त करून थांबतो.
धन्यवाद..
जि.प.शिक्षक पतसंस्था गंगाखेड ..सत्कार्यासाठी सदैव पुढे..
www.facebook.com/जिपशिक्षक-पतसंस्था-गंगाखेड-1501363863527649/
www.teacherssocietygkd.blogspot.in/


Thursday 11 February 2016

तंत्रास्नेही युगाकडे

सर्व शिक्षक बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार,
---आजमितीस ज्ञानरचनावादाचे व E-Learning चे वारू चौफेर उधळत असताना आपल्या गंगाखेड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा सुद्धा कुठे कमी नाहीत म्हणून या कामी आपल्या तालुक्यातील सर्व शिक्षक वर्ग हा तंत्रस्नेही बनला पाहिजे तद्वतच आपल्याकडील शाळांमध्ये त्या तंत्रज्ञानाचा उपयोजनात्मक विकास व्हायला हवा या रास्त भूमिकेसाठी आपल्या पंचायत समितीतील शिक्षण विभाग तळमळीने कार्य करत आहे. या शिक्षण विभागाच्या कार्यात आपल्या जि.प.शिक्षक पतसंस्था गंगाखेड चे सहकार्य असायलाच हवे या हेतूने  शिक्षण विभागाने दिनांक १५/०२/२०१६ रोजी तालुक्यातील सर्व तंत्रस्नेही शिक्षकांची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केलेली आहे.या कार्यक्रमाच्या आयोजनात  आपली पतसंस्था सहकार्य करत आहे.
---या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील नामवंत तंत्रस्नेही शिक्षक प्रशिक्षक श्री. बालाजी जाधव हे उपस्थित राहून मोलाचे मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या १० ते ५ या दिवसभराच्या कार्यशाळेत आपणास E-Learning, डिजिटल शाळा, Apps निर्मिती, शाळेचा Blog कसा तयार करावा, Video  निर्मिती, तंत्रज्ञानाचा अध्यापनात उपयोग, इत्यादी बाबींवर सखोल मार्गदर्शन करणार आहेत. आपल्या तालुक्यातील सर्व तंत्रस्नेही व जिज्ञासू शिक्षक बांधवानी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
---या कार्यशाळेसाठी शिक्षण विभाग स्वतंत्ररित्या आदेश निर्गमित करणार आहे.
----आपल्या तालुक्यातील जि.प.शाळांचा कायापालट होऊन आपला तालुका जिल्ह्यात गुणवत्तेच्या बाबतीत अग्रेसर राहावा आणि त्या कार्यात आपल्या पतसंस्थेने  कुठेतरी खारीचा वाटा उचलला पाहिजे या दृष्टीकोनातून आपली पतसंस्था या कार्यशाळेस सहकार्य करत आहे.शिक्षकांच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात पतसंस्था कार्यरत राहण्याचा प्रयत्न करत आहे. साहजिकच हे सर्व आपल्या सर्व शिक्षक बांधवांच्या सहकार्यातून होत आहे. तेव्हा या कार्यशाळेस आपण गंगाखेड तालुक्यातील बहुतांशी शिक्षकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा  त्याच बरोबर आपल्या शेजारील पालम व सोनपेठ या तालुक्यातील शिक्षक बांधवांना ज्यांना शक्य आहे त्यांनीही या कार्यशाळेस उपस्थित राहून याचा  लाभ घ्यावा अशी पतसंस्थेची आपणा सर्वाना विनंती आहे.
धन्यवाद.
आपल्या सर्वाना या नवीन सृजनशील दिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा, ..सुप्रभात.

जि.प.शिक्षक पतसंस्था गंगाखेड..सत्कार्यासाठी सदैव पुढे.
www.teacherssocietygkd.blogspot.in/
www.facebook.com/जिपशिक्षक-पतसंस्था-गंगाखेड-1501363863527649/?fref=ts