Tuesday 10 May 2016

आणखी एक पाऊल पुढे ....

सर्व शिक्षक बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार,
---मित्रानो आपल्या गंगाखेड जि.प.शिक्षक पतसंस्थेच्या सर्व सन्माननीय सभासद बांधवांचा एक विश्वस्त आणि समानातील एक सभासद म्हणून आपणाशी हितगुज करताना मला आज आनंद होतो आहे कि, आज दिनांक 10/05/2016 रोजी आपले एक बांधव, आमचे स्नेही  श्री. पांडुरंग लांडगे सर जे कि प्रा.शा. दामपुरी केंद्र सुप्पा येथे कार्यरत आहेत, त्यांनी पतसंस्थेत आज FD केली आहे. मी आपल्या सर्व सन्माननीय सभासद बांधवांच्या तद्वतच सर्व सन्माननीय संचालक मंडळाच्या वतीने श्री. लांडगे सरांचे मनस्वी आभार व्यक्त करतो. त्यांनी आपल्या संस्थेच्या विश्वस्त मंडळावर विश्वास टाकत पतसंस्थेत गुंतवणूक केली हि अतिशय आनंदाची गोष्ट आहे.
------मित्रानो आपण आपल्या पतसंस्थेतील सर्व विश्वस्त मंडळावर विश्वास टाकून संस्थेच्या आर्थिक प्रगतीत सहभागी होत आहात हि बाब संस्थेच्या हिताच्या दृष्टीने अतिशय मोलाची आहे. आपण जेवढे संस्थेच्या व्यवहारात सहभागी होऊत तेवढ्या प्रमाणात आपल्या संस्थेत कार्यप्रवणता येऊन पारदर्शकता निर्माण होईल. मित्रानो मागच्या काही वर्षात आपण संस्थेत लक्ष न दिल्यामुळे जे आपले नुकसान झाले ते आता आपण सर्वांनी संस्थेच्या प्रत्येक कार्यात सहभागी होऊन भरून काढू, जेणे करून संस्था हा विषय आपल्या जिव्हाळ्याचा हेऊन संस्थेत शत प्रतिशत स्वच्छ तथा पारदर्शक कारभार चालेल.
-----सरतेशेवटी आपल्या सर्वांकडून संस्थेच्या उन्नतीसाठी सहकार्याची अपेक्षा करतो. आणि पुनश्च एकदा मी श्री लांडगे सरांचे संस्थेत FD केल्याबद्दल आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वाना एका सुंदर दिवसाच्या शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद.
शुभ सकाळ.
जि.प.शिक्षक पतसंस्था गंगाखेड एक पाऊल प्रगतीकडे.
You can visit us @

www.facebook.com/जिपशिक्षक-पतसंस्था-गंगाखेड-1501363863527649/