Sunday 10 January 2016

ग्रेट भेट..

-----ग्रेट भेट.
आज जि.प.शिक्षक पतसंस्था अहमदपूर चे अध्यक्ष, माझे समपदस्थ आणि वर्गमित्र, श्री. रणजीत चौधरी ( Ranjeet S. Choudhary ) यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. भेट ब-याच दिवसांनी झाली. सोबत आमच्या पतसंस्थेचे उपाध्यक्ष श्री. पुणे सर, कोषाध्यक्ष श्री. चीमले सर आमचे जिवलग मित्र संचालक श्री. लोळे सर व जाधव सर होते. दोन वर्गमित्र दोन वेगवेगळ्या जिल्ह्यातील शिक्षक पतसंस्थांचे अध्यक्ष झाल्याचा दुर्मिळ आनंदयोग अनुभवास आला.
रणजीत म्हणजे एक व्यासंगी, बहुआयामी, कार्य तत्पर, मनमिळावू, शिक्षकांच्या कोणत्याही प्रश्नासाठी कुठेही व कोणत्याही वेळी धावून जाणारा, कार्यकर्ता. अहमदपूर तालुका तथा लातूर जिल्ह्यातील शिक्षकांसाठी कायम अहोरात्र झटणारा कार्यकर्ता. खूप आनंद झाला. आपलाच वर्गमित्र आपल्या कार्यसिद्धीने एवढ्या कमी वयात अहमदपूर च्या नामांकित अशा पतसंस्थेचा अध्यक्ष म्हणून कार्य करतोय आणि धडाडीचे शिक्षक तथा संस्थेच्या सभासदांच्या हिताचे निर्णय नुसतेच घेत नाही तर अमलात आणतो हि निश्चितच स्वागतार्ह गोष्ट आहे. तरुणांच्या हाती सत्ता दिल्यास त्याचे आउटपुट निश्चितपणे मिळते याचे तो एक उत्तम उदाहरण आहे.
भेटीत अहमदपूर पतसंस्थेच्या अनेक धोरणाविषयी त्याने माहिती दिली. त्यांच्या ठेवी, सभासद भाग, व कर्ज वसुलीच्या अनेक बाबी स्वीकारार्ह वाटल्या.
.
.
----एक गोष्ट निश्चितच सत्य...बदलाचे वारे वाहू लागले आहेत...भगवान श्रीकृष्णाच्या श्रीमदभगवतगीतेतील उक्तीप्रमाणे ....बदल अटळ आहे, आणि आपण त्यात आपले भरीव योगदान दिले पाहिजे..
.
.
शुभरात्री..

www.teacherssocietygkd.blogspot.in/
www.facebook.com/जिपशिक्षक-पतसंस्था-गंगाखेड-1501363863527649/?ref=hl


Tuesday 5 January 2016

(R.D.)मासिक ठेव योजना..

-----मासिक ठेव योजना.
****सर्व शिक्षक बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार,
----मित्रांनो, आपण आपल्या पतसंस्थेच्या सभासद बांधवांना वित्त पुरवठा करण्यासाठी आपल्या परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक परभणी या बँकेकडून साधारणतः १३ ते १३.५ % व्याजदराने ९५००००० रुपयांची  सी.सी. उपलब्ध करून त्या माध्यमातून वित्त पुरवठा करत असतो: हा  एक पारंपारिक वित्तउपलब्धीचा मार्ग आहे.परंतु सहकारातील खरा वित्तउपलब्धीचा मार्ग हा सभासदांकडून उभारण्यात येणारा निधी हाच असतो. या सभासदांच्या निधीच्या जोरावरच पतसंस्था खऱ्या अर्थाने उभारी घेत असते. या सभासदांनी उभारलेल्या निधीच्या पतपुरवठ्या नंतर आपण किती दराने व्याज आकारणी करायची हा मग आपल्या सर्वांचा अधिकार आहे. माझ्या माहितीनुसार आजमितीस महाराष्ट्रात अशा अनेक पतसंस्था आहेत ज्या त्यांच्या सभासदांना केवळ  ७ % एव्हढ्या अल्पदरात वित्तपुरवठा उपलब्ध करून देतात. परंतु या संस्थेचे स्वतःचे भांडवल असते.
---त्या दिशेने आपल्या जि.प.शिक्षक पतसंस्थेच्या वाटचालीचे पहिले पाऊल म्हणून आम्ही आपल्या सर्व सभासद बांधवांसाठी मासिक ठेव योजना(R.D.) सुरु केली आहे. या योजनेची काही ठळक वैशिष्टे पुढील प्रमाणे सांगता येतील.
---एक वर्षानंतर आपणास कधीही पूर्ण रक्कम काढता येईल.
---एक वर्ष एक दिवसापासून दोन वर्षापर्यंत व्याजदर 8 %.
---दोन वर्ष एक दिवसापासून तीन वर्षापर्यंत व्याजदर 9%.
---तीन वर्ष एक दिवसापासून चार वर्षापर्यंत व्याजदर 10%.
---चार वर्ष एक दिवसापासून पाच वर्षापर्यंत व्याजदर 11%
---आपल्या साभासादा व्यतिरिक्त  जि.प.च्या कुठल्याही कर्मचा-याना या योजनेचा लाभ घेता येण्यासाठी केवळ 100 रुपयांच्या फीस वर  नाममात्र सभासदत्व मिळू शकते.
---एवढ्या मोठ्या स्वरूपाचा व्याजदर आपणास कुठेही मिळणार नाही. आणि इतर ठिकाणी आता ONLINE च्या कामांमुळे आर.डी. काढणे अधिक जिकरीचे असल्याकारणाने आपणा सर्वाना जि.प.शिक्षक पतसंस्था गंगाखेड च्या वतीने सर्व संचालक मंडळाकडून नम्र आवाहन करण्यात येत आहे कि या योजनेचा जास्तीत जास्त बांधवांनी लाभ घ्यावा.
.

सुप्रभात एका नव्या युगाची...
धन्यवाद ...
जि.प.शिक्षक पतसंस्था गंगाखेड ..एक पाऊल प्रगतीकडे....
.
.
.
आपल्या संस्थेच्या FACEBOOK पेज ला लाईक करा..
www.facebook.com/जिपशिक्षक-पतसंस्था-गंगाखेड-1501363863527649/?ref=hl
आपल्या संस्थेच्या BLOG ला अवश्य भेट द्या.
http://teacherssocietygkd.blogspot.in/